- श्री ज्ञानेक्ष्वर महाराजांची आरती *
७८४. आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा । सेविती
साधुसंत । मनु वेधला माझा ॥ आरती ॥धृ०॥
लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुंरंग ।
नाम ठेविलें ज्ञानी ॥आ०॥
कनकाचें ताट करीं । उष्या गोपिका नारी । नारद तुंबरही ।
साम गायन करी ॥आ०॥
प्रकट गुह्य बोले । विश्व ब्रह्मचि केलें । रामा जनार्दनी ।
पायीं मस्तक ठेविलें ॥३॥
0 टिप्पण्या