- श्री विठ्ठलाची आरती *
७८३. युगें अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगीं
रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुण्डलिका भेटी परब्रह्म
आलें गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा
राहीच्या वल्लभा पावे जीवलगा । जयदेव जयदेव ॥धृ०॥
तुळशीमाळा गळा कर ठेऊन कटि । कासे पीतांबर
कस्तुरी लल्लाटीं । देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमाजी
स्नानें जे करिती । दर्शन हेंळामात्रें तयां होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावे ओंवाळीती ॥३॥
0 टिप्पण्या