चित्ती तुझे पाय डोळा रुपाचे ध्यान


चित्ती तुझे पाय डोळा रुपाचे ध्यान ।
अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ।।१।।

हेचि एक तुम्हा देवा मागणे दातारा ।
उचित ते करा माझा भाव जाणोनि ।।धृ।।

खुंटले जाणीव माझे बोलणे आता ।
कळो यावी तैसी करा बाळाची चिंता ।।२।।

तुका म्हणे आता नको देऊ अंतर ।
न कळे पुढे काय बोलू विचार ।।३।।

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या