बोलोनिया दाऊं कां तुम्ही नेणा जी देवा :- काकड आरती अभंग


बोलोनिया दाऊं कां तुम्ही नेणा जी देवा ।
ठेवाल तेँ ठेवा ठायी तैसा राहेन ।।१।।

पांगुळले मन कांही नाठवे उपाय ।
म्हणवूनी पाय जीवी धरुनि राहिलो ।।धृ।।

त्यागे भोगे दुःख काय सांडावे मांडावे ।
ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशंका ।।२।।

तुका म्हणे माते बाळ चुकलिया वनी ।
न पवता जननी दुःख पावे विठ्ठले ।।३।।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या