माझे चित्त तुझे पायी। राहे ऐसे करी कांही।


माझे चित्त तुझे पायी। राहे ऐसे करी कांही।
धरोनिया बाहीं। भव हा तारी दातारा।।१।।

चतुरा तु शिरोमणि । गुण लावण्यांची खाणी।
मुगुट सकळा मणि। धन्य तूंचि विठेबा।।धृ।।

करी तिमिरांचा नाश। उदयो होउनि प्रकाश।
तोडी आशापाश। करी वास ह्रदयी।।२।।

पाहे गुंतलो नेणता। माझी असो तुम्हां चिंता।
तुका ठेवी माथा। पायी आता राखावे।।३।।

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या