जळो माझे कर्म वाया केली कटकट :-काकड आरती अभंग


जळो माझे कर्म वाया केली कटकट |
झाले तैसे तट नाही आले अनुभवा ||१ |

आता पुढे धीर काय देऊ या मना|
ऐसे नारायणा प्रेरीले ते पाहिजे  || धृ ||

गुणवंत केलो दोष जाणायासाठी |
माझे माझे पोटी बळकट दुषण  || २ ||

तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा |
बरवा हा लळा पाळीयेला शेवटी || ४ ||

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या