ऐसी वाट पाहे काही निरोप का मूळ


ऐसी वाट पाहे काही निरोप का मूळ।
   का हो कळवळा तुम्हा उमटेची ना ।।१।।

   अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे।
   लावूनिया आसे चाळवूनि ठेविले ।।धृ।।
   काय जन्मा येवुनिया केली म्या जोडी।
   ऐसे घडोघडी चित्ता येते आठवूं ।।२।।

   तुका म्हणे खरा न पवेचि विभाग।
   धिक्कारीते जग हेचि लाहे हिशोबे।।३।।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या