जळोत ती येथे उपजविती अंतराय :- काकड आरती अभंग


जळोत ती येथे उपजविती अंतराय |सायासाची जोडी माझी तुमचे पाय ||१ ||

आता मज साह्य येथे करावे देवा | तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनी ||धृ ||


भोगे रोगा जोडोनिया दिले आणिका | अरुचि ते हो कां आता सकळांपासूनि || २ ||

तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी |नाही ये लौकिकी आता मज वर्तणे || ३ ||

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या