कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतला ।
चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ।।धृ।।
सांधकांचा माय बाप । दर्शने हरे ताप ।
सर्वाभूती सुखरुप । ज्ञानोबा माझा ।।१।।
ज्ञानीयांचा शिरोमणी । वंद्य जो कां पूजास्थानी ।
चिंतकांचा चिंतामणी । ज्ञानोबा माझा ।।२।।
चालविली जड भिंती । हरली चांगयाची भ्रांती ।
मोक्ष मार्गीचा सांगाती । ज्ञानोबा माझा ।।३।।
रेड्या वेद बोलविला । गर्व व्दीजांचा हरविला ।
शांती रुपे प्रगटला । ज्ञानोबा माझा ।।४।।
ब्रह्म साम्राज्य दिपीका । वर्णिली गीतेची टीका ।
विठोबाचा प्राण सखा । ज्ञानोबा माझा ।।५।।
गुरु सेवे लागी जाण । शरण एका जनार्दन ।
त्रैलोक्याचे जीवन । ज्ञानोबा माझा ।।६।।

फारच छान .धन्यवाद.
उत्तर द्याहटवाजुन्या आठवणी प्रज्वलित केल्या धन्यवाद
उत्तर द्याहटवाफारच सुंदर .आम्ही भजनी मंडळात म्हणत असू पण आधीचे लिहिलेले सापडत नव्हते.छान वाटले
उत्तर द्याहटवासुंदर अभंग
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाAamhi ha abhang aamcha dnyaneshari parayanamadhe survatila mahnat asto roj
उत्तर द्याहटवाRam Krishna Hari
उत्तर द्याहटवाखुप छान अभंग आहे👌
उत्तर द्याहटवाखुप छान अभंग आहे👌
उत्तर द्याहटवाಕೈಲಾದ ಪುತಳಾ ಇದು ಬಹಳೇ ಮಧುರ ಮಧುರ ಗೀತೆ ಅದೆ.
उत्तर द्याहटवा