कां हो तुम्ही निश्चिँतीने निजलेती हरी


कां हो तुम्ही निश्चिँतीने निजलेती हरी |
मानियले सुख आम्ही वाचू कैशापरी ।।१।।

उठा सावध व्हावे क्षेम सकळां द्यावे ।
जया जी वासना तया तैसे पुरवावे ।।२।।

जन्मोजन्मी सांभाळिले क्षमा करा अन्याय ।
कृपा करी गा देवा आंम्हा तूची बापमाय।।३।।

तुका म्हणे करा वडीलपण दानासी ।
जेणे सुख होय सकळ जनासी ।।४।।

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. जय हरी! प्रस्तुत अभंगाचा संत तुकाराम सार्थ गाथ्यामध्ये अंतर्भाव नाही. कोणत्या गाथ्यातून संकलीत केला आहे, कृपया अवगत व्हावे.

    उत्तर द्याहटवा