भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती

ashram pandharpur

भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती । पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती।।१।।

ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवितो माथा ।। धृ ।।

काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती । 
कोटी ब्रम्हहत्या मुख पाहता जाती ।।२।।

राही रखुमाई उभ्या दोन्ही दो बाही । मयूर पिच्छे चामरे ढाळिती ठायी ।।३।।

तुका म्हणे दीप घेऊन उन्मनीची शोभा । 
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ।।४।।


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या