धन्य ते अरण रत्नाची खाण

धन्य ते अरण रत्नाची खाण|

जन्मला निधान सांवता तो ||१ ||

सांवता सागर प्रेमाचे आगर |

घेतला अवतार माळ्या घरी|| २ ||

धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता| साठविला दाता त्रेलोक्याचा|| ३ ||

नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला | वंश उद्धरिला माळीयाचा || ४ ||

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. श्री मारुती देवस्थान ट्रस्ट माळी समाज माळीवाडा संगमनेर येथे हभप मंगलताई जेजुरकर यांनी 31/7/2024 रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह

    उत्तर द्याहटवा