जे का रंजले गांजले

जे का रंजलें गांजलें | त्यासि म्हणे जो आपुलें || धृ ||

तो चि साधु ओळखावा | देव तेथें चि जाणावा || १ ||

मृदु सबाह्य नवनीत | तैसें सज्जनाचें चित्त || २ ||

ज्यासि आपंगिता नाहीं | त्यासि घरी जो हृदयीं || ३ ||

दया करणें जें पुत्रासी | ते चि दासा आणि दासी || ४ ||

तुका म्हणे सांगूं किती | तो चि भगवंताची मूर्ती || ५ ||

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या