सद्गुरुराये कृपा मज केली

सद्गुारायें कृपा मज केली | परी नाहीं घडली सेवा कांहीं || १ ||

सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना | मस्तकीं तो जाणा ठेविला कर || धृ ||

भोजना मागती तूप पावशेर | पडिला विसर स्वप्नामाजी || २ ||

कांहीं कळहे उपजला अंतराय |म्हणोनियां काय त्वरा जाली || ३ ||

राघवचैतन्य कैशवचैतन्य | सांगितली खुण मळिकेची || ४ ||

बाबाजी आपलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरी || ५ ||

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या