ओंकार स्वरुपा, सद्गुरु समर्था


ओंकार स्वरुपा, सद्गुरु समर्था |अनाथाच्या नाथा, तुज नमो || धृ ||

नमो मायबापा, गुरुकृपाघना |तोडी या बंधना मायामोहा |
मोहोजाळ माझे कोण नीरशील | तुजविण दयाळा सद्गुरुराया ||१||

सद्गुरुराया माझा आनंदसागर | त्रैलोक्या आधार गुरुराव |
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश |ज्या पुढे उदास चंद्र, रवी ||२||

रवी, शशी, अग्नि, नेणती ज्या रुपा |स्वप्रकाशरुपा नेणे वेद |
एका जनार्दनी गुरुपरब्रम्ह |तयाचे पै नाम सदा मुखी ||३||

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या