कां गा केविलवाणा केलो दीनाचा दीन ।
काय तुझी हीन शक्ति झालिसे दिसे।। १।।
लाज येते मना तुझा म्हणविता दास ।
गोडी नाही रस बोलिलीया सारिखी ।।धृ।।
लाजविली मागे संतांची ही उत्तरे ।
कळो येते खरे दुजे एकावरुनि ।।२।।
तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी ।
प्रसादा वाचूनि तुमचिया विठ्ठला ।।३।।