श्री शंकराची आरती लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

श्री शंकराची आरती 

लवथवती विक्राळा ब्रह्मांडीं माळा । विषें
कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा । लावण्यसुंदर
मस्तकीं बाळा । तेथुनियां जळ निर्मळ वाहे
झुळझुळां ॥१॥

जय देव जय देव श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज
कर्पूरगौरा ॥धृ०॥

कर्पूरगौर भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं
पार्वती सुमनांच्या माळा । विभूतींचे उधळण
शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥

देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें । त्यामाजीं
अवचित हलाहल उठिलें । तें त्वां असुरपणें
प्राशन केलें । नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥३॥

व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी । पंचानन
मनमोहन मुनिजनसुखकारी । शतकॊटींचें बीज
वाचे उच्चारी । रघुकुळ टिळक रामदासां अंतरी ॥४॥

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या