सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी
पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव
जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥धृ०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी
कुंकुमकेशरा । हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ॥जय॥
लंबोदर पितांबर फणीवर बंधना । सरळ सोंड वक्रतुंड
त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावें निर्वाणी रक्षावें सुरवरवंदना ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ॥धृ०॥
0 टिप्पण्या