काय सांगू आता संतांचे उपकार

काय सांगू आता संतांचे उपकार |
मज निरंतर जागविती || १ ||

काय द्यावे त्यासी व्हावे उतराई 
ठेविता हा पायी जीव थोडा || धृ ||

सहज बोलणे हित उपदेश 
करुनी सायास शिकविती || २ ||

तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती 
तैसे मज येती सांभाळीत || ३ ||

टिप्पणी पोस्ट करा

8 टिप्पण्या

  1. काय सागगु आता सताचे उपकार रामराव म.ढोक याचे कार्तन

    उत्तर द्याहटवा