उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला।
वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला।।१।।
वाळवंटापासुनि महाद्वारापर्यँत।
सुरवरांची मांदी उभे जोडोनि हात।।धृ।।
शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी।
कवाडा आडुनि पाहताती जगजेठी।।२।।
सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ।
रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ।।३।।
रंभादिक नाचती उभ्या जोडोनि हात।
त्रिशुळ डमरु घेऊनि आला गिरजेचा कांत।।४।।
पंचप्राण आरत्या घेऊनिया देवस्त्रिया येती।
भावे ओवाळिती राही रखुमाईचा पती।।५।।
अनंत अवतार घेसी भक्ताकारणे।
कनवाळू कृपाळू दीनालागी उध्दरणे।।६।।
चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी।
पाठीमागे डोळे झाकूनी उभी ते जनी।।७।।
kunal iunal
उत्तर द्याहटवा