तेचि एक संत जाणा | आवडती नारायणा
Vaarkarichalee
जुलै १५, २०२०
तेचि एक संत जाणा |
आवडती नारायणा || १ ||
पांडुरंगावांचोनि कांहीं |
न जाणे दुसरे पाही || २ ||
मुखीं नाम अमृतवाणी |
धाले मनीं डुल्लती || ३ ||
सेना म्हणे पायीं माथां |
त्यांच्या ठेवियला आतां || ४ ||