जातां पंढरीसी सुख वाटे जीवा

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा |

 आनंदें केशवा भेटतांचि || १ ||


या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं|  

पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे || २ ||


ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार |

 ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें || ३ ||


ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक  |

ऐसा वेणुनादीं काला दावा || ४ ||


ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर |

 ऐसें पाहतां निर्धार नाहीं कोठें || ५ ||


सेना म्हणे खूण सांगितली संतीं |

 यापरती विश्रांती न मिळे जीवा || ६ ||

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या