मुखीं नाम नाहीं । त्याची संगती नको पाही

मुखीं नाम नाहीं । त्याची संगती नको पाही ॥ १ ॥

ऐसियाचे मुखीं माउली । वार घालितां विसरली ॥ २ ॥

जया नावडे संतसंगती । अधम जाणावा निश्चिती ॥ ३ ॥

नाम घेतां लाज वाटे । रंभे निर्लज्ज भेटें ॥ ४ ॥

जातां हरिकीर्तना । नावडे ज्याच्या मना ॥ ५ ॥

सेना म्हणे त्यास । कुलासुद्धां नर्कवास ॥ ६ ॥

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या