अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति |
मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ||1||
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं |
न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ||धृ||
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें |
बैसलों धरणें । हाका देत दाराशी ||2||
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला |
आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ||3||

Nice
उत्तर द्याहटवा