सुंदर ते ध्यान उभे विटेवरी|
कर कटावरी ठेवोनिया||1||
तुळसीहार गळा कासे पितांबर|
आवडे निरंतर हेंची रूप||धृ||
मकर कुंडले तळपती श्रवणी|
कंठी कौस्तुभ मणी विराजित ||2||
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख|
पाहीन श्रीमुख आवडीने||3||
कर कटावरी ठेवोनिया||1||
तुळसीहार गळा कासे पितांबर|
आवडे निरंतर हेंची रूप||धृ||
मकर कुंडले तळपती श्रवणी|
कंठी कौस्तुभ मणी विराजित ||2||
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख|
पाहीन श्रीमुख आवडीने||3||