उठा उठा साधु संत| साधा आपुलाले हित|


उठा उठा साधु संत| साधा आपुलाले हित|
जाईल हा नरदेह | मग कैचा भगवंत|| ||धृ ||

उठोनि वेगेसी | चला जाऊ राउळासी|
जळती पातकांच्या राशी| काकड आरती देखिलिया||१|| 


उठोनिया पहाटे|विठ्ठल पहा उभा विटे|
चरण तयाचे गोमटे |अमृत दृष्टी अवलोका || २ ||

जागे करा रुक्मिणीवरा|देव आहे निदसुरा|
वेगे निंबलोण करा |दृष्ट होईल तयासी || ४ ||

पुढे वाजंत्री वाजती |ढोल दमामे गर्जती |
होते काकडा आरती |पांडुरंग रायाची || ५ ||

सिंहनाद शंख भेरी |गजर होतो महाद्वारी |
केशवराज विटेवरी |नामा चरण वंदितो|| ६ ||

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या