बाळ सगुण गुणांचें तान्हें गे | बाळ दिसतें गोजिरवाणें गे | काय सांगतां गाऱ्हाणे गे | गोकुळींच्या नारी ||धृ||
श्रीरंग माझा वेडा गे | याला नाहीं दुसरा जोडा गे |
तुम्ही याची संगत सोडा गे | गोकुळींच्या नारी ||1||
पांच वर्षाचें माझें बाळ गे | अंगणी माझ्या खेळे गे |
कां लटिकाची घेतां आळ गे | गोकुळींच्या नारी ||2||
सांवळा गे चिमणा माझा | गवळणीत खेळे राजा |
तुम्ही मोठ्या ढालगजा गे | गोकुळींच्या नारी ||3||
तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे | आळ घेतां या गोपाळा गे | तुम्ही ठाईच्या वोढाळा गे | गोकुळींच्या नारी ||4||
तुम्ही लपवूनी याची गोटी गे | लागतां गे याचे पाठीं गे | ही एवढीच रीत खोटी गे | गोकुळींच्या नारी ||5||
तुम्ही लपवूनी याचा भोवरा गे | आळ घेतां शारंगधरा गे | तुम्ही बारा घरच्या बारा गे | गोकुळींच्या नारी ||6||
हा ब्रम्हविधीचा जनिता गे | तुम्ही याला धरुं पाहतां गे | हा कैसा येईल हातां गे | गोकुळींच्या नारी ||7||
नामा म्हणे यशोदेशी गे | हा तुझा हृषीकेशी गे |
किती छळीतो आम्हांसी गे | गोकुळींच्या नारी ||9||

Jay Hari vitthal
उत्तर द्याहटवाKhup chan ahet gavaln
उत्तर द्याहटवा