येग येग विठाबाई |
माझे पंढरीचे आई ||1||
भीमा आणि चंद्रभागा|
तुझे चरणीच्या गंगा ||धृ||
इतुक्यासहित त्वां बा यावें|
माझे रंगणी नाचावें ||2||
माझा रंग तुझे गुणीं|
म्हणे नामयाची जनी ||3||
माझे पंढरीचे आई ||1||
भीमा आणि चंद्रभागा|
तुझे चरणीच्या गंगा ||धृ||
इतुक्यासहित त्वां बा यावें|
माझे रंगणी नाचावें ||2||
माझा रंग तुझे गुणीं|
म्हणे नामयाची जनी ||3||