माझिये मनीचा जाणोनिया भाव

माझिये मनीचा जाणोनिया भाव।
तो करी उपाव गुरुरावो।।१।।

आवडीचा मंत्र सांगितला सोपा।
जेणे नव्हे गुंफा कांही कोठे।।२।।

जाती पुढे एक उतरले पार ।
हा भवसागर साधुसंत ।।३।।

जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी ।
उतार संगाडी तापे पेटे।।४।।

तुका म्हणे संती दाखविला तारू ।
कृपेचा सागरू पांडुरंग।।५।।

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा