पैल तो गे काऊ कोकताहे

पैलतो गे काऊ कोकताहे |
शकुन गे माये सांगताहे ||१||

उड उड रे काऊ तुझे सोनेन मढवीन पाऊ |
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ||२||


दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी |
जीवा पढिये तयाची गोडी सांग वेगी ||३||

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी |
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ||४||

टिप्पण्या